Sunday 20 March 2011

लढण्याची जिद्द बाकी आहे

हजार घाव झेलूनही खिंडीत बाजी बाकी आहे 
जोवर येत नाहीत तोफांचे आवाज तोवर लढण्याचा हट्ट बाकी आहे
पडला जरी वज्रगड तरी पुरंदरवर मुरारबाजी बाकी आहे 
कंठनाल छेदुनही झुंजणारा देह बाकी आहे
घात करूनही आप्तांनी साथीस सह्याद्री बाकी आहे
कैद होवूनही शंभू अंतरी स्वराज्य बाकी आहे
एक लढाई संपली तरी युद्ध अजून बाकी आहे
जरी पराभव झाला क्षणभर तरी लढण्याची जिद्द बाकी आहे
-
परिमल विश्वास गजेंद्रगडकर
२१/०१/२०११
"बचेंगे तो और भी लडेंगे" या मराठी बाण्याच्यावरून स्फुरलेल्या ओळी

No comments:

Post a Comment